पुनरुत्थान गुरुकुलमचे कार्य कौतुकास्पद : विनोद तावडे

By admin | Published: April 27, 2017 04:59 AM2017-04-27T04:59:54+5:302017-04-27T04:59:54+5:30

चिंचवड येथील चापेकर स्मारक समीतीच्या गुरुकुलममध्ये नव्या आणि जुन्या पारंपरिक शिक्षणाची सांगड घालून नवी पिढी

Revival Gurukulam's work appreciated: Vinod Tawde | पुनरुत्थान गुरुकुलमचे कार्य कौतुकास्पद : विनोद तावडे

पुनरुत्थान गुरुकुलमचे कार्य कौतुकास्पद : विनोद तावडे

Next

पिंपरी : चिंचवड येथील चापेकर स्मारक समीतीच्या गुरुकुलममध्ये नव्या आणि जुन्या पारंपरिक शिक्षणाची सांगड घालून नवी पिढी तयार करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली. जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सहकार्यवाह रवी नामदे, चापेकर स्मारक शिक्षण समिती अध्यक्ष नितीन बारणे, शकुंतला बन्सल, हरी भारती, गतिराम भोईर, राजू सराफ, सिद्धेश्वर इंगळे आदी उपस्थित होते.
गुरुकुलममध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची माहिती प्रभुणे यांनी तावडे यांना दिली. तावडे यांनी संगणक, मूर्तीकाम, शिवण आदी विभागांना भेट देऊन गो-शाळा आणि प्रयोग शाळेची माहिती घेतली. मल्लखांब करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक त्यांनी केले. गुरुकुलम्मध्ये सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलांना शिक्षण दिले
जात आहे़ एक चांगली नवी पिढी तयार करण्याचे काम प्रभुणे उत्तमरीत्या करत असल्याचे तावडे यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Revival Gurukulam's work appreciated: Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.