बारा लाख मतदार बजावणार हक्क
By admin | Published: January 6, 2017 07:00 AM2017-01-06T07:00:19+5:302017-01-06T07:00:19+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत १२ लाख नागरिक मतदार असणार असून, मतदारनोंदणी अभियानात सुमारे एक लाख ८७ हजार मतदार नोंदविले गेले असून
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत १२ लाख नागरिक मतदार असणार असून, मतदारनोंदणी अभियानात सुमारे एक लाख ८७ हजार मतदार नोंदविले गेले असून, २१ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रकाशित होणार आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होत असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावतीकरण, पुरवणी यादी प्रकाशित करणे, याद्या प्रभागनुसार विभागाने असे काम सुरू आहे. याविषयी माहिती देताना निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘‘२०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार एवढी होती. तर लोकसंख्या सुमारे साडेसतरा लाख होती. आता शहराची लोकसंख्या २१ लाखांच्या आसपास गेली आहे. लोकसंख्येच्या साठ टक्के मतदार असतात. त्यामुळे निवडणुकीसाठी १२ लाख मतदार असणार आहेत. सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात मतदारनोंदणी अभियान राबविण्यात आले होते.’’ (प्रतिनिधी)