संगीत रजनीमध्ये रसिक चिंब
By Admin | Published: September 1, 2015 04:01 AM2015-09-01T04:01:53+5:302015-09-01T04:01:53+5:30
पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने स्व. पार्श्वगायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक स्व. मुकेश, रफी, किशोर यांना श्रद्धांजलीपर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने स्व. पार्श्वगायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक स्व. मुकेश, रफी, किशोर यांना श्रद्धांजलीपर ‘एक शाम मुकेश, रफी, किशोर के नाम’ संगीत रजनी कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे झाला. कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान व पुरस्कारवितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात अध्यक्ष विजय उलपे, पी. चंद्रा, रवींद्र कांबळे, कमरुद्दीन शेख, रॉकी डिसूझा, स्वप्निल पवार, अरुण ठाकरे, रवी पिल्ले, सुरेश काळे, शैलेश घावटे, प्रकाश हेरेकर, रोहिणी पांचाळ, राखी जैन, पूजा अरुण देवगावकर यांनी आपली गीते सादर केली. निवेदन जिप्सन सोलंकी यांनी केले. वादक राजेश डेव्हिीड, श्याम चंदनशिवे, अमीर शेख, संदीप कर्नावट, अनिल धोत्रे, अमोल पांढरे यांनी संगीतावर स्वरसाज चढविला. नेपथ्य व ध्वनिप्रकाश संयोजन अनुप कोठावळे यांनी केले.
‘जहाँ डाल डाल पर सोनेकी’ या देशभक्ती गीतवंदनेने सुरुवात झाली. ‘दिवानोंसे ये मत पुछो, मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, मै हूँ झुमरू, धिरे धिरे बोल कोई सून ना ले, परबतके उस पार, शोखियोंमे घोला जाए, पदी है पदी, मै जहाँ चला जाऊ ँ, चेहरेसे जरा आँचल, चाँद को क्या मालूम, यू तो हमने लाख हंसी देखे है, दरिया किनारे एक बंगलो गं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, अगं पोरी संभाल दर्याला तुफान, पत्ता पत्ता बुटा बुटा, आ दिल क्या मेहफील में तेरे, मिल गया हम को साथी, आजा आजा, मै हूँ प्यार तेरा, मुहब्बत जिंदा रहती है, क्या खुब लगती हो,’ इत्यादी गीते सादर केली. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्युनियर देवानंद- फोटोग्राफर धेंडे व पूजा यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
नगरसेविका सुजाता पालांडे, पंढरीनाथ हजारे, अमर कापसे, नंदकुमार सूर्यवंशी, सत्यसेन शिरसाठे, किरण सुवर्णा, जाकीर शेख, रशिद शेख, मुराद काझी, शकील इनामदार, संजय खाडे, आर. जी. गायकवाड, सुरेश भोसले, राजू जाधव, कमलाकर सकट उपस्थित होते.(प्रतिनिधी)