पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर; शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:21 PM2022-07-21T21:21:36+5:302022-07-21T21:23:46+5:30

रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर...

Road Romeo on police radar in Pimpri-Chinchwad; Patrolling school and college premises | पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर; शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त

पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर; शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त

googlenewsNext

पिंपरी : शाळा व महाविद्यालय परिसरात महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. तसेच असे प्रकार दिसून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. त्यामुळे शाळा व महाविदयालय परिसरात रेंगाळणारे तसेच रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
 
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीम महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासह खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा मोठ्या संख्येने आहेत. तसेच महाविद्यालये देखील आहेत. त्यात विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात मोठी गर्दी होते. यात काही तरुण व नागरिक रेंगाळतात. तसेच काही टवाळखोरांचाही वावर तेथे असतो. त्यांच्याकडून विद्यार्थीनी तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रकार होतो. यातील काही प्रकरणे पोलिसांकडे येतात. गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. मात्र, असे प्रकार घडूच नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त घालण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

छेडछानीच्या घटना किंवा काही अनुचित प्रकार देखील त्यामुळे रोखता येणार आहेत. अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ०२०-२७३५२५०० या क्रमांकावर फोन करून किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Road Romeo on police radar in Pimpri-Chinchwad; Patrolling school and college premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.