Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत दारूचे दुकान लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:54 IST2021-12-20T16:49:16+5:302021-12-20T16:54:49+5:30
दरोडेखोरांनी देशी दारू बार व बियर शॉपी चालवणाऱ्यास बेदम मारहाणही केली

Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत दारूचे दुकान लुटले
पिंपरी : कोयता व शस्त्रांचा धाक दाखवून देशी दारू बार व बियर शॉपी चालवणाऱ्यास बेदम मारहाण केली. तसेच दुकानातून ३५ हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लुटमारीची ही घटना घडली.
बबन रामराव खराटे (वय २६, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराटे हे जुनी सांगवी येथील एम. यू. शितोळे नावाचे देशी दारू बार व बियर शॉपी चालवतात. फिर्यादी हे शनिवारी सायंकाळी दुकानात होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती हातात कोयते घेऊन फिर्यादीच्या दुकानात आले.
नंतर आरोपींनी फिर्यादीला शस्त्रांचा धाक दाखविला. एका आरोपीने फिर्यादीची काॅलर पकडून शिवीगाळ करून फिर्यादीला मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने दुकानाच्या काउंटरमधून दिवसभर जमा झालेली सुमारे ३५ हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी पायी पळून गेले.