घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास ; चिखली येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:57 PM2019-11-10T15:57:54+5:302019-11-10T16:02:01+5:30
चिखल येथे घरफाेडीची घटना घडली असून यात घरातील माैल्यवान वस्तू चाेरुन नेण्यात आल्या आहेत.
पिंपरी : घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यानी घरामध्ये प्रवेश केला. घरातील लॅपटॉप, मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण पाऊण लाखांचा ऐवज चोरून नेला. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता हा प्रकार राजे शिवाजीनगर, चिखली येथे उघडकीस आला.
याप्रकरणी किरण किसन एरंडे (वय ४६, रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन एरंडे यांचे घर २८ ते २९ ऑक्टाेबर या कालावधीत कूलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप कशाच्यातरी साहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील मोबाईल, लॅपटॉप तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चिखली पोलीस तपास करत आहेत.