दहावी परीक्षा फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट, मावळ तालुक्यातील शाळांतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:51 AM2018-12-23T00:51:43+5:302018-12-23T00:53:30+5:30

मावळातील काही शाळांमध्ये दहावी बोर्ड फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पालकांनी पावती मागितली असता ती दिली जात नाही.

The robbery of students in the name of the tenth examination fee, the types of schools in Maval taluka | दहावी परीक्षा फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट, मावळ तालुक्यातील शाळांतील प्रकार

दहावी परीक्षा फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट, मावळ तालुक्यातील शाळांतील प्रकार

Next

कामशेत : मावळातील काही शाळांमध्ये दहावी बोर्ड फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पालकांनी पावती मागितली असता ती दिली जात नाही. अथवा उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नक्की दहावीची बोर्ड फी किती हा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पालक यांनी येथील पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांची फी विषयी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची वेबसाइट याची माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवा-उडावीची उत्तरे दिली. शाळा प्रशासन यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी आम्ही २०० रुपये विकासनिधी व ४२५ रुपये अशी बोर्ड फी घेतो. यात विलंब आकार फी आकारली जाते, अशी माहिती दिली. तसेच इतर फी आकारली जाते. मात्र त्याची पावती दिली जात असल्याची माहिती दिली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना नेमकी फी किती आहे, भरलेल्या फीची रिसीट का दिली जात नाही, असा प्रश्न पालकामधून विचाराला जात आहे. याबाबत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी परिसरातील पालकामधून होत आहे. याकडे पदाधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

प्रत्येक शाळेत पालक शिक्षक संघाच्या सभेत फी व यासंबंधी माहिती सांगून, ती मंजूर केली जाते. मात्र कामशेतमधील शाळेच्या संदर्भात जर काही तक्रारी असल्यास याची चौकशी व माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- एम. व्ही. वाव्हळ, मावळ गट शिक्षण अधिकारी

मी एक महिन्यापूर्वी शाळेवर प्रभारी म्हणून नियुक्त झालो असून, मला या संदर्भात काही माहिती नाही आणि हे माझे काम नाही.
- बी़ आऱ दहितुले, पंडित नेहरू विद्यालय प्रभारी मुख्याध्यापक

गेल्या काही दिवसांपासून शाळेतून दहावीच्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षेच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. त्याची पावती ही दिली जात नाही. पावती नसल्याने पाल्य घरातून पैसे घेऊन गैरफायदा घेऊ शकतो ही भीती आहे.
- संतोष वीर,
सामाजिक कार्यकर्ते

माझी मुलगी महक हिने घरी दहावीच्या परीक्षा फी साठी १५०० रुपये मागितले. याविषयी इतर पालकांना चौकशी केली असता त्यांनी १५०० रुपये फी असल्याचे सांगितले़ मात्र इतर ठिकाणी चौकशी केली असता इतकी फी नाही हे कळले. त्यामुळे अजून फी भरली नाही.
- नालबंद मुन्ना मुनीर नबू शेख, पालक

माझा मुलगा महेश हा पंडित नेहरू विद्यालयात दहावीत शिकत असून, त्याची बोर्ड फी १५२० रुपये नुकतीच भरली आहे. या फी संदर्भात अनेक पालकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे.
- सुनील रणदिवे,
पालक

Web Title: The robbery of students in the name of the tenth examination fee, the types of schools in Maval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.