मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा

By admin | Published: March 27, 2017 02:52 AM2017-03-27T02:52:43+5:302017-03-27T02:52:43+5:30

कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली,

Rumor | मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा

मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा

Next

पिंपरी : कधी देहूरोड रेल्वे स्थानकावर, तर कधी तळेगाव, पिंपरी आदी भागात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी दिसून आली, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून शहरात पसरू लागल्या आहेत. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ती पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले
आहे.
मुले पळविणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. नागरिकांमध्ये भीती पसरेल, अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित होत आहे. परंतु मूल पळविल्याचे एकही खात्रीलायक वृत्त माध्यमांतून प्रसारित झालेले नाही. काही दिवसांपूर्वी चिखली परिसरातून गायब झालेली तीन अल्पवयीन मुले मुंबई रेल्वे स्थानकात आढळून आली. ही मुले स्वत:च रेल्वेने मुंबईला गेली होती. त्यांना कोणीही फूस लावून अगर पळवून नेले नव्हते. १६ वर्षांखालील अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाले, अशी पोलीस दप्तरी नोंद होत नाही. त्यांचे अपहरण झाले, अशीच नोंद पोलिसांकडे केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या अपहरणाच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, हे निदर्शनास येते. अशा घटनांमध्ये वाढ याचाच अर्थ लहान मुलांना कोणीतरी पळवून नेत आहे, असा काढला जातो. प्रत्यक्षात अल्पवयीन मुले घरातून स्वत:हून निघून गेलेली असतात.
नुकतीच एक घटना बालेवाडीतील क्रीडा संकुलात घडली. विद्यार्थी खेळाडंूसाठी उपलब्ध करून दिलेल्या वसतिगृहातून वेळोवेळी कोणाबरोबर तरी बाहेर गेलेल्या मुलीचे कायदेशीर कस्टडीतून अपहरण केले, अशा स्वरूपाचा गुन्हा  संबंधित तरुणाविरुद्ध दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.