बसस्थानकात बॉम्बची अफवा
By admin | Published: January 30, 2017 02:51 AM2017-01-30T02:51:10+5:302017-01-30T02:51:10+5:30
येथील एसटी बसस्थानकात बॉम्ब असल्याचा फोन मंचर पोलीस ठाण्यात आला. या वेळी लगेच यंत्रणा तत्पर झाली. बॉम्बशोधक व नाशक पथक आले.
मंचर : येथील एसटी बसस्थानकात बॉम्ब असल्याचा फोन मंचर पोलीस ठाण्यात आला. या वेळी लगेच यंत्रणा तत्पर झाली. बॉम्बशोधक व नाशक पथक आले. राणी श्वानाच्या मदतीने बसस्थानकात कसून शोध घेण्यात आला.
एका रसवंतीगृहात काळ्या बॅगेत असलेली ती बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात आली. यादरम्यान बघ्यांची एकच गर्दी झाली होती, नंतर हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंचर येथील एसटी बसस्थानकात मॉकड्रिल पार पडले. बसस्थानक आवारात बॉम्ब असल्याचा फोन पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना गेला व सर्व यंत्रणा तत्पर झाल्या. मंचर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले पुणे येथून बॉम्बशोधक व नाशक पथक आले. या पथकातील राणी श्वानाने परिसर पिंजून काढला. यादरम्यान घोडेगाव, चाकण, राजगुरुनगर, खेड, आळंदी येथील पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला. रुग्णवाहिका,आगीचा बंब घटनास्थळी आला.
पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. मांजरे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. घाटगे यांच्यासह ४५ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
बॉम्बशोधक नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे
यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांनी
यात सहभाग घेतला. एस. पी. पिलाने, विनोद गायकवाड, जे. एस. सापटे, प्रशांत भुजबळ, एस. एस. गिलबिले, नवनाथ नाईकडे,
एस. वाय. चिमटे, मांजरे यांनी सहभाग. (वार्ताहर)