मोटारीसह पळवला ऐवज

By admin | Published: June 30, 2017 03:44 AM2017-06-30T03:44:26+5:302017-06-30T03:44:26+5:30

दोन चोरट्यांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधनजवळ एका मोटारचालकाला लिफ्टच्या बहाण्याने थांबविले. मोटारीत बसल्यानंतर

Run with the car | मोटारीसह पळवला ऐवज

मोटारीसह पळवला ऐवज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दोन चोरट्यांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधनजवळ एका मोटारचालकाला लिफ्टच्या बहाण्याने थांबविले. मोटारीत बसल्यानंतर काही अंतर पुढे जाताच शस्त्राचा धाक दाखवून मोटारचालकास मोटारीतून खाली ढकलले. मोटारीसह मोटारीतील कॉम्प्युटर स्विच असा सुमारे ३ लाख २७ हजारांचा माल पळवून नेला. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश मोहिते (वय ४०, रा. मालाड, मुंबई) असे फिर्यादीचे नाव आहे. ते पुण्यातून मुंबईच्या दिशेने जात होते.
त्यांच्या मोटारीत कॉम्प्युटर स्विच, मोबाईल असा माल होता. मंगळवारी रात्री चोरट्यांनी फिर्यादीची लुबाडणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जी़ जे़ धामणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Run with the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.