सैैनिकांसाठी विद्यार्थ्यांकडून राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:00 AM2017-07-28T06:00:26+5:302017-07-28T06:00:26+5:30
भारताच्या सीमेचे रक्षण करणाºया भारतीय जवानांसाठी कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्या मंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशू विहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक हजार राख्या
सांगवी : भारताच्या सीमेचे रक्षण करणाºया भारतीय जवानांसाठी कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्या मंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशू विहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक हजार राख्या तयार करून कारगिल विजयदिनी राख्या पाठवल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले, रामभाऊ खोडदे, परशुराम मालुसरे उपस्थित होते. या वेळी आबासाहेब जंगले म्हणाले, की अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. देश भक्तीचे महत्त्व कळते. स्वत: बनविलेल्या कलाकृतीचा आनंद मिळतो तो वेगळाच. मुख्याध्यापक शिवाजी माने व कलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या. आपल्या कुटुंबापासून दूर असणाºया सीमेवरील जवान यांच्या रक्षा बंधन दिवशी आनंदात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या शाळेने केला आहे, असे मुख्याध्यापक म्हणाले.
या उपक्रमासाठी दत्तात्रय जगताप, भाऊसो दातीर, सुनीता टेकवडे, हेमलता नवले, मनीषा लाड, स्वप्नील कदम, सुनीता मगर, शीतल शीतोले, मानसी माळी, संदीप भुसारे, राहुल यादव, साविता मोरे, भरती घोरपडे, पूजा कोल्हे, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, योगीता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.