साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:32 AM2017-07-31T04:32:38+5:302017-07-31T04:32:38+5:30
पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ आता डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे.
पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ आता डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी सकाळी डेंगीने एकाचा बळी घेतला. नागरी आरोग्याकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हनणे आहे.
पावसाळ्यातील आरोग्यांचा समस्या आणि दूषित पाण्यामुळे होणाºया आजारात प्रचंड वाढ झाली आहे. काविळीचे रुग्णांमध्ये तिपटीने, तर टायफाईडच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उपलब्ध सुविधांचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होत असल्याने पर्यावरणावर आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
काही दिवसांपासून शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. प्रदूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, जठरांचा व आतड्यांचा दाह, विषमज्वर हे आजार होतात. पावसाळा सुरू झाल्याने स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्यातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे होणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया आदी रोगांची लागण होऊ शकते. नागरी आरोग्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत साथीचे आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.