सुरक्षा कठड्याच्या लोखंडी पाईपची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:58 AM2018-04-27T06:58:09+5:302018-04-27T06:58:09+5:30

पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पवना नदीवर पूल उभारण्यात आला आहे.

Safety rock iron pipe steal | सुरक्षा कठड्याच्या लोखंडी पाईपची चोरी

सुरक्षा कठड्याच्या लोखंडी पाईपची चोरी

Next

पिंपरी : पिंपरीगावाकडून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या मार्गावर पवना नदीवर शंकरबुवा श्रीपती वाघेरे पूल आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली आहे. कठड्याचे लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पाईप बसवून सुरक्षा कठड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पवना नदीवर पूल उभारण्यात आला आहे. पूल अरुंद आहे. पिंपरी गावातून रहाटणी, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, वाकड, विशालनगर, वाकड, कस्पटे वस्ती, मानकर वस्ती, हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होतो. पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, पुणे-मुंबई महामार्ग आदी भागांतून पिंपरी गावातून पिंपळे सौदागर आणि रहाटणीकडे जाण्यासाठी हा एकमेव सोयीचा पूल आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पीएमपीएमएल बस, खासगी कंपन्यांच्या बस, स्कूल बस, कार आणि दुचाकींचा यात मोठा समावेश आहे. वाहनांची संख्या जास्त असून, पूल अरुंद आहे. त्यामुळे येथे सातत्याने वर्दळ असते.
पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईपचे संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. या कठड्याचे पाईप चोरीला गेले आहेत. काही पाईप तुटले आहेत. त्यामुळे वाहने पुलावरून खाली जाण्याची शक्यता आहे. काही पाईप जीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचीही तुटण्याची शक्यता आहे. भंगार व्यावसायिकांनी आणि काही चोरट्यांनी रात्री पाईपची चोरी केलेली आहे. उर्वरित पाईप चोरी करण्याच्या उद्देशाने तोडण्यात येत आहेत.

कचºयामुळे दुर्गंधी
पुलावरून नदीत निर्माल्य आणि कचरा टाकण्यात येत होता. त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने पुलावर संरक्षक जाळ्या लावल्या. तरीही काही वाहनचालक पुलावर वाहन थांबवून जाळीवरून नदीत निर्माल्य टाकतात. काही जणांकडून पुलाच्या संरक्षक कठड्यांलगत कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून उचलण्यात येत नाही. त्यामुळे कचरा येथे कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाºया नागरिकांना आणि वाहनचालकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न
पूल मुळातच अरुंद आहे. त्यामुळे या पुलावर पदपथ नाही. त्यामुळे पादचाºयांना अरुंद पुलावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. ‘मॉर्निंग वॉक’ करणारे नागरिकही या पुलाचा वापर करतात. त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न येथे उपस्थित होतो. भरधाव वाहनांची पादचाºयांना धडक बसून येथे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे समांतर पूल उभारून त्यावर पादचाºयांसाठी पदपथाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

फलकाची दुरवस्था
४पुलाच्या बाजूला फलक लावण्यात आला आहे. या फलकाचीही दुरवस्था झाली आहे. फलक गंजला असून, त्यावरील माहिती वाचणे अशक्य झाले आहे. याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका अधिकाºयांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असतानाही याबाबत ते उदासीन असल्याचे दिसून येतात.

समांतर पुलाचे काय?
४अरुंद पुलामुळे वाहनांचा खोळंबा होऊन अपघाताचे प्रकार घडतात. त्यासाठी या पुलाला समांतर पूल उभारण्याची मागणी आहे. त्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र अद्यापही महापालिकेकडून त्याबाबत कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे समांतर पुलाचे काय झाले, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Safety rock iron pipe steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी