बालाजीचरणी सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:07 AM2017-08-08T03:07:36+5:302017-08-08T03:07:36+5:30

येथील साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या भजनी मंडळाने तिरुपती येथे सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.

Sai Bhajan Seva for the second consecutive year | बालाजीचरणी सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा

बालाजीचरणी सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा

Next

शिरगाव : येथील साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या भजनी मंडळाने तिरुपती येथे सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.
साईबाबांच्या भजनाबरोबर विविध भाषेतील भजने व अभंग, गौळणी, भावगीतांचा या सेवेत समावेश असल्याने भाविकांची गर्दी होती, अशी माहिती साईभक्त नंदकुमार जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाल तिरुमला देवस्थानकडून प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रतिशिर्डीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.
पखवाज वादक प्रणीत गावस्कर, गायक वैभव रसाळ, रमेश भुजबळ, ढोलकी वादक अनिकेत गिरी, रितेश करणूक, ओमकार झिमगरे, शुभम उगळे, सनई वादक कल्याणनप्पा सहभागी झाले होते. नंदकुमार जाधव, राकेश मुगळे, शालीग्राम खोसे, विकास पतंगे, भीमराव जगताप, साईबाबा मंदिराचे व्यवस्थापक, अनिल देवकर, गणेश कपिले, विजय लोखंडे, अप्पा वावरे, दत्ता गडेकर, सुरेश ढमढेरे, प्रतीक कोंडालकर, सदा इंगळे, श्रीकांत पाटील, दिलीप कदम, रमेश थोरवे, संतोष चव्हाण, मनोज पंडित आदींनी सहभाग घेतला.

पिंपरी पुणे व शिरगाव या परिसरातील मंडळींनी भजनसेवा दिली. बालाजी येथे जाऊन महाराष्ट्रातील कोणत्याच भजनी मंडळानी असा कार्यक्रम केला नव्हता. त्यामुळे व्यवस्थापनाने कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढील वर्षी आवर्जून येण्याचे आमंत्रण दिले. अशा प्रकारचा कार्यक्रम बालाजी मंदिरात होण्याची पहिलीच वेळ होती. मराठी, हिंदी भावगीतांचा कार्यक्रम असल्यामुळे तेथील मंदिर परिसर साईमय झाला होता.

तेथील प्रादेशिक भाषिकानींही भजने भक्तिभावाने ऐकत कलाकारांना दाद दिली. भजनाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण तेथील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर दाखविण्यात आले. साईभजानांबरोबर बालाजीचे भजन, पांडुरंगाच्या भजनांनी परिसर दुमदुमून गेला. काही श्रोते तर स्वत: सहभागी झाले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत साईबाबांचे असंख्य निस्सीम भक्त आहेत. महाराष्ट्रातील लोकांची बालाजीवर श्रद्धा आहे. माजी आमदार प्रकाश देवळे व सचिव सपना लालचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

Web Title: Sai Bhajan Seva for the second consecutive year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.