Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

By विश्वास मोरे | Published: June 27, 2024 07:15 PM2024-06-27T19:15:11+5:302024-06-27T19:18:12+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे....

Saint Shreshtha Tukaram Maharaj's palanquin leaves tomorrow, crowd of devotees | Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

पिंपरी : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (२८ जून) देहूतून प्रस्थान होणार आहे. यानिमित्ताने अवघे देहू भक्तिमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९ वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे.

सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

प्रस्थान कार्यक्रम रुपरेषा

पहाटे ४.३० - महापूजा
५ ते ७ - काकडा
८ ते ९ - गाथा भजन
१० ते १२ - काल्याचे किर्तन
१२ ते १ - जरीपटका सन्मान
१ ते २ - पादुका पूजन व सत्कार
दुपारी २ - पालखी प्रस्थान
सायंकाळी ६ - पालखी मुक्काम
रात्री ९ ते ११ - किर्तन, जागर

महापालिका तयारी-

- शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक
- सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर
- मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा
- दिंडीप्रमुखांचा सत्कार
- पालखी मार्गावर वृक्षारोपण
- फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे
- वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध

Web Title: Saint Shreshtha Tukaram Maharaj's palanquin leaves tomorrow, crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.