संतांनी तोडल्या जाती-पातीच्या भिंती - श्रीनिवास पाटील

By admin | Published: June 16, 2017 09:23 PM2017-06-16T21:23:04+5:302017-06-16T21:23:16+5:30

जातिपातीच्या भिंती तोडून संतानी वाटचाल केली. राजकियदृष्टया कोण किती मोठा आहे याला फारशी किंमत नाही. मी वारकरी संप्रदयाचा पाईक होत असतानाच

Saints break up - The walls of the clay - Srinivas Patil | संतांनी तोडल्या जाती-पातीच्या भिंती - श्रीनिवास पाटील

संतांनी तोडल्या जाती-पातीच्या भिंती - श्रीनिवास पाटील

Next

ऑनलाइन लोकमत
देहूगाव, दि. 16 - जातिपातीच्या भिंती तोडून संतानी वाटचाल केली. राजकियदृष्टया कोण किती मोठा आहे याला फारशी किंमत नाही. मी वारकरी संप्रदयाचा पाईक होत असतानाच घरातील ३० वर्षे अखंड चाललेली वारीची वाटचाल यामुळे माझ्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार कमानीचे लोकार्पन होत असल्याचे समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे केले.
येथील वैंकुठगमण मंदिर ते मुख्यमंदिर रस्त्यावर उत्तराभिमुखी श्री संत तुकाराम महाराज चौदा टाळकरी महाद्वार कमानीचे लोकार्पन राज्यपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांच्या पत्नी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, माजी आमदार विलास लांडे, डॉ. विश्वनाथ कराड, संजयमहाराज पपाचपोर, बाळासाहेब काशीद, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळसकर,जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, हेमलता काळोखे, माजी सरपंच हेमा मोरे, रत्नमाला काळोखे, शैला खंडागळे, संस्थानचे माजी विश्वस्थ रामभाऊ मोरे, विश्वजीत मोरे, माऊली काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी व्हावी व राज्यात धो धो पाऊस पडावा अशी पांडूरंगाकडे मागणी करीत हर्षवर्धन पाटील यांनी बळीराजाला जीवदान देण्याची मागणी केली. यावर राज्यपाल पाटील यांनी यासाठी वृक्षारोपन केले पाहिजे तरच धो धो पाऊस होऊ शकतो, असे सांगितले. यावेळी खासदार बारणे म्हणाले की या कमानीमुळे देहूच्या वैभवात भर पडणार आहे.आमदार भेगडे व डॉ. कराड यांनी कमानीच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जालिंदर काळोखे यांनी केले.

Web Title: Saints break up - The walls of the clay - Srinivas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.