नव्या उत्पादनांची रस्त्यावर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:20 AM2017-08-02T03:20:15+5:302017-08-02T03:20:15+5:30

लहान मुले, महिला शहरांतील मुख्य चौकांत काही ना काही वस्तू विकताना दिसून येतात. सिग्नलला थांबणाºया वाहनाकडे जाऊन छत्री, गाडीची काच पुसण्यासाठी वापरात येणारा पाण्याचा स्प्रे

Sale of new products on the road | नव्या उत्पादनांची रस्त्यावर विक्री

नव्या उत्पादनांची रस्त्यावर विक्री

Next

पिंपरी : लहान मुले, महिला शहरांतील मुख्य चौकांत काही ना काही वस्तू विकताना दिसून येतात. सिग्नलला थांबणाºया वाहनाकडे जाऊन छत्री, गाडीची काच पुसण्यासाठी वापरात येणारा पाण्याचा स्प्रे, उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी काचेला लावली जाणारी जाळी अशा विविध वस्तू चालकांना विकत आहेत.
दुकानात उपलब्ध होण्याअगोदर सिग्नलवर थांबणाºया महिलांकडे यातील काही वस्तू दिसून येतात. त्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होत असून, वाहतुकीला अडथळा व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या लहान मुलांसाठी आकर्षण ठरलेले ‘स्पिनर’ हे खेळणे कोणत्या दुकानात मिळेल, याचा पालकांना शोध घ्यावा लागतो. आजूबाजूच्या कोणाकडे असे खेळणे दिसून आल्यास मुले पालकांकडे तसेच खेळणे मिळावे, असा हट्ट धरतात. पालकांना ते खरेदीसाठी बाजारपेठ धंडाळावी लागते. विशिष्ट दुकानांमध्येच अशी खेळणी मिळत असल्याने दुकानदार सांगेल ती रक्कम देऊन खेळणे खरेदी करावी लागते. असे एखादे नवे उत्पादन बाजारपेठेत दाखल झाले, तर पहिल्यांदा चौकात सिग्नलला विक्री होत असल्याचे पहावयास मिळते.
मुंंबई-पुणे महामार्गावरील मोरवाडी चौकात सकाळी नऊपासूनच महिलांचा घोळका पाहायला मिळतो. कोणत्या जागेवर कोणी थांबायचे, याचे नियोजन करून ते त्यांच्याकडील वस्तू विकताना दिसून येत आहेत.

Web Title: Sale of new products on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.