तळेगाव दाभाडेत बनावट दस्त करून जागेची विक्री; फसवणूक प्रकरणी वकिलासह सात जणांवर गुन्हा
By नारायण बडगुजर | Published: August 4, 2022 09:04 PM2022-08-04T21:04:40+5:302022-08-04T21:05:02+5:30
सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल...
पिंपरी : एक हेक्टर ६० आर (चार एकर) जागेचा बनावट दस्त करून ती जागा विक्री केली. फसवणूक केल्याप्रकरणी वकिलासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे येथे ९ मे २०१७ ते ३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
मयूर दत्ताराम कदम (वय ३२, रा. कल्याण पश्चिम, मुंबई), राजू काशिनाथ जाधव (वय ४३, रा. खंडाळा, ता. मावळ), बाळू भिकू अबनावे (वय ६३, रा. ठाणे), रवी माटया पाटील (वय ५७, रा. डोंबिवली, ठाणे), उमेश शिवाजी खराडे (वय ३५, रा. तुंगार्ली, कैवल्य धामजवळ, पुणे), ॲड. अनिकेत विलासराव जाधव (वय ३२, रा. नेते, ता. मुळशी) व अनोळखी बोगस व्यक्ती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुमित प्रकाश गवळी (वय ३८, रा. लोणावळा गावठाण, ता. मावळ)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाेविंद प्रसाद दिनानाथ तिवारी हे महाराष्ट्राबाहेर राहण्यासाठी असल्याचा फायदा आरोपींनी घेतला. आरोपींनी आपआपसात संगनमत करून तिवारी यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवली. तिवारी यांच्या जागी बोगस इसम उभा करून तिवारी यांच्या दोन हेक्टर तीन आर यातील क्षेत्र एक हेक्टर ६० आर (चार एकर) या गाजेचा बनावट दस्त तळेगाव दाभाडे येथे बनवला. त्याच्या अनुषंगाने पुढे इतर व्यवहार करून जागा आणखी इसमांना विक्री करून दस्त बनवले. यातून तिवारी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.