उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:59 AM2018-06-12T02:59:56+5:302018-06-12T02:59:56+5:30

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सुनील शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.

Sangram Kadam for deputy chief | उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडे बिनविरोध

उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडे बिनविरोध

Next

तळेगाव दाभाडे  - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सुनील शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.
पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी त्यांना मदत केली. नगर परिषदेत भाजपा १४, जनसेवा विकास समिती ६, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६ नगरसेवक असे पक्षीय बलाबल असून, भाजपा, जनसेवा विकास समिती, आरपीआय (आठवले गट) महायुतीची नगर परिषदेत सत्ता आहे.जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे अरुण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज वैध ठरले. सुनील शेळके यांनी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांच्याकडे अरुण माने यांचा अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यांचा आदर ठेवून किशोर भेगडे यांनी माने यांचा अर्ज मागे घेतला. आगामी काळातही तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती शहराच्या विकास कामासाठी पूर्ण सहकार्य करील; परंतु सर्व प्रभागांत निष्पक्षपणे विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा किशोर भेगडे यांनी व्यक्त केली.
माने यांच्या माघारीनंतर संग्राम काकडे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चित्रा जगनाडे यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्ष काकडे यांच्या अभिनंदनपर झालेल्या सभेत आमदार संजय भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, पक्षप्रतोद सुशील सैदाणे, विशाल खंडेलवाल, अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे , संतोष दाभाडे पाटील, माजी उपनागराध्यक्ष सुनील शेळके,चंद्रभान खळदे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचनाताई आवारे यांचे भाषण झाले.
या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, मुख्य प्रवर्तक किशोर आवारे,पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम,माजी सभापती निवृत्ती शेटे,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे,संत तुकाराम कारखान्याचे संचालक गोपीचंद गराडे, हभप नितीनमहाराज काकडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत काकडे,बाबा शेट्टी उपस्थित होते.

कारकिर्दीत सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन शहर विकासाला पूरक असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी गतिमान करण्याचे आश्वासन संग्राम काकडे यांनी दिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने शहर विकासाला प्राधान्य देत समन्वयाची भूमिका घेतल्याबद्दल नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष काकडे यांनी समितीचे आभार मानले.

Web Title: Sangram Kadam for deputy chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.