मावळचे मविआचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटलांवर तीन कोटींचे कर्ज तर एकूण संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:48 AM2024-04-24T10:48:03+5:302024-04-24T10:50:43+5:30
दहावी पास असलेल्या वाघेरे तसेच त्यांच्या पत्नी उषा यांची एकत्रित संपत्ती २३ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे....
पिंपरी : महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. दहावी पास असलेल्या वाघेरे तसेच त्यांच्या पत्नी उषा यांची एकत्रित संपत्ती २३ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे.
वाघेरे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचा आणि स्वत:वर ६४ लाखांचे कर्ज असल्याचा उल्लेख केला आहे. पत्नीच्या नावे २ कोटी ३३ लाख ८४ हजार ५५१ रुपयांचे कर्ज आहे. संजोग वाघेरे यांची ६ कोटी ८५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांची पत्नी उषा यांच्या नावे ५ कोटी २० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.
शेअर्समध्ये ३७ लाखांची गुंतवणूक
वाघेरे आणि त्यांच्या पत्नीने शेअर्समध्ये गुंतवणूक केली. पवना सहकारी बँक, पीएफ आदींसह विविध बँकांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत. वाघेरे यांच्या नावे २७ लाख ९५ हजार २१२, तर उषा वाघेरे यांच्या नावे ९ लाख ३३ हजार ६८२ रुपये गुंतवले आहेत. एकूण ३७ लाख रुपये त्यांनी शेअर्स आणि बँकामध्ये गुंतवले आहेत.
साडेचार कोटींचे दिले कर्ज
वाघेरे कुटुंबीयांनी इतरांना दिलेले कर्ज, जमीन व इतर व्यवसायातील गुंतवणूक ४ कोटी ५३ लाख २३ हजार १९१ रुपयांची आहे. शुभम उद्योग व ऋषीकेश वाघेरे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले आहेत.
हातातील पैसे
संजोग : १ लाख ५४ हजार ३१२
उषा : १ लाख ४६ हजार ५१०
सोने
संजोग : ३५१ ग्रॅम : २१ लाख ७६ हजार ५७१
उषा : १०५ ग्रॅम : ६ लाख ५१ हजार ५००
पिस्तूल : ५० हजार ४९०
संजोग वाघेरे
जंगम मालमत्ता : ४ कोटी ४६ लाख ३६ हजार ४९४
स्थावर मालमत्ता : ६ कोटी ८५ लाख
उषा वाघेरे
जंगम मालमत्ता : १ कोटी ८९ लाख ६३ हजार ११५
स्थावर मालमत्ता : ५ कोटी २० लाख
कर्ज :
संजोग वाघेरे : ६४ लाख ४८ हजार २७१
उषा वाघेरे : २ कोटी ३३ लाख ८४ हजार ५५१
एकूण : २ कोटी ९८ लाख ३२ हजार ८२२
गुंतवणूक :
संजोग वाघेरे : २७ लाख ९५ हजार २१२
उषा वाघेरे : ९ लाख ३३ हजार ६८२
दिलेली कर्जे
संजोग वाघेरे : ३ कोटी १८ लाख ९८ हजार ४७६
उषा वाघेरे : १ कोटी ३४ लाख २४ हजार ७१५