सरपंच, ग्रामसेवकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By admin | Published: June 10, 2017 02:10 AM2017-06-10T02:10:43+5:302017-06-10T02:10:43+5:30
ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची तक्रार दिल्यामुळे कासारसाई ग्रामपंचायतीच्या सभेत सुनावणीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची तक्रार दिल्यामुळे कासारसाई ग्रामपंचायतीच्या सभेत सुनावणीसाठी बोलावण्यात आलेले लक्ष्मण दशरथ थोरवे (वय ४५) यांना धक्काबुक्की, जातीवाचक शिवीगाळ केली. अशा आरोपाची त्यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कासारासाई गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह ११ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार ललित आनंद शिंदे (सरपंच), स्वप्नील नामदेव रासकर (ग्रामसेवक), युवराज हनुमंत कलाटे (सदस्य), कर्मचारी केतन सुरेश शितोळे, कासारसाई सरपंच
ललित आनंद शिंदे, ग्रामसेवक स्वप्नील नामदेव रासकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज हनुमंत कलाटे, केतन सुरेश शितोळे (ग्रामपंचायत कर्मचारी), सुभाष देवराम थोरवे यांच्यासह
अन्य सहा जणांवर हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे यासह अन्य गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.