मावळातील अठरा गावांत सरपंच, उपसरपंच बिनविरोध
By Admin | Published: August 25, 2015 04:46 AM2015-08-25T04:46:03+5:302015-08-25T04:46:03+5:30
मावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका सोमवारी झाल्या असून, १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुका सोमवारी झाल्या असून, १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत बिनविरोध व विजयी सरपंच व उपसरपंच : (आढले खुर्द) बिनविरोध सरपंच : स्वाती भोईर व उपसरपंच बाबूराव येवले, (अजिवली) बिनविरोध सरपंच: रेखा सुतार व उपसरपंच : संतोष भिकोले, (आंबी) बिनविरोध सरपंच : सुवर्णा शिंदे व उपसरपंच वामन वारिंगे, (आपटी) बिनविरोध सरपंच : अंजना कोकरे व उपसरपंच : मंगल साबळे, (डाहुली) बिनविरोध सरपंच : प्रतिमा शेलार व उपसरपंच नाथाभाऊ पिंगळे, (धामणे) बिनविरोध सरपंच : कुंदा गराडे व उपसरपंच : कल्पना गराडे, (गहुंजे) बिनविरोध सरपंच : शीतल बोडके व उपसरपंच उमेश बोडके, (कशाळ) सरपंच : यमुना गवारी व उपसरपंच : तुकाराम जाधव, (खांडशी) बिनविरोध सरपंच : ललिता राणे व उपसरपंच : अंकुश सिरसठ, (कुरवंडे) सरपंच : रोशन ससाणे व उपसरपंच विशाल कडू, (कुसगाव खुर्द) सरपंच (पद रिक्त) बिनविरोध उपसरपंच : गणेश लालगुडे, (महागाव) सरपंच : सुरेखा जाधव व उपसरपंच : विनायक सावंत, (मळवंडी ठुले) बिनविरोध सरपंच : फुलाबाई उदेकर व उपसरपंच : रोहिदास ठुले.
(मोरवे) बिनविरोध सरपंच : पौर्णिमा गाऊडसे व उपसरपंच : किसन आखाडे, (नाणे) सरपंच : मनीषा नाणेकर व उपसरपंच : शारदा वंजारी, (पाटण) बिनविरोध सरपंच : रुपाली पटेकर व उपसरपंच : संदीप तिकोणे, (सांगवडे) बिनविरोध सरपंच : दीपाली लिमण व उपसरपंच : संतोष राक्षे , (साते) सरपंच : विठ्ठल शिंदे व उपसरपंच : विद्या मोहिते, (शिरदे) बिनविरोध सरपंच : शांताराम बगाड व उपसरपंच : रमण खरात, (शिवली) बिनविरोध सरपंच : फुलाबाई हिलम व उपसरपंच : अनंता लोहर, (शिवणे) बिनविरोध सरपंच : राधिका वाळुंज व उपसरपंच : दत्तात्रय ओझरकर, (थुगाव) बिनविरोध सरपंच : सावित्रीबाई सावंत व उपसरपंच : सीताराम पोटफोडे. (वार्ताहर)