सरपंचांच्या आज, उद्या होणार निवडी
By admin | Published: August 22, 2015 02:10 AM2015-08-22T02:10:05+5:302015-08-22T02:10:05+5:30
मावळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडणुकींना शनिवारी प्रारंभ होत आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यातील २४ गावांचे सरपंच-उपसरपंचपद
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडणुकींना शनिवारी प्रारंभ होत आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यातील २४ गावांचे सरपंच-उपसरपंचपद निवडले जाणार आहेत. रविवारी खडकाळे (कामशेत) येथील व सोमवारी २६ गावांत पदांची निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यापैकी शनिवारी आढे, बऊर, चिखलसे, दारुंब्रे, घोणशेत, करंजगाव, कार्ला, खांड, कोथुर्णे, कुसगाव बुद्रुक, मळवली, माळेगाव बुद्रुक, नवलाख उंब्रे, पाचाणे, परंदवडी, साई, सोमाटणे, ताजे, टाकवे बुद्रुक, तिकोणा, वेहरगाव, येलघोल, येळसे व कुसगाव पमा या गावांतील सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहेत.
रविवारी खडकाळे (कामशेत) आणि सोमवारी आढले खुर्द, अजिवली, आंबी, आपटी, डाहुली, धामणे, गहुंजे, कशाळ, खांडशी, कुरवंडे, कुसगाव खुर्द, महागाव, मळवंडी ठुले, मोरवे, नाणे, पाटण, सांगवडे, साते, शिरदे, शिवली, शिवणे, थुगाव, उकसान, उर्से वडेश्वर व वारूच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक होणार आहे. त्या त्या गावात सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकांचे नामनिर्देशनपत्र सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दाखल करता येईल. सकाळी ११ ते ११.३० वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी होईल., असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)