शनिवारी दप्तराविना शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:47 PM2018-07-19T23:47:21+5:302018-07-19T23:47:43+5:30

वाचू आनंदे आणि दप्तराविना शाळा हे उपक्रम माध्यमिक शाळांमध्ये राबविले जाणार आहेत. दप्तराविना शाळा हा उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणार आहे.

Saturday school without Daptarva | शनिवारी दप्तराविना शाळा

शनिवारी दप्तराविना शाळा

googlenewsNext

पिंपरी : महापालिका शिक्षण समितीची पहिली सभा गुरुवारी झाली. त्यामध्ये शिक्षण समितीचे अधिकार आणि कार्य यावर चर्चा झाली. तसेच नवीन वर्षांत दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यावर एकमत झाले. वाचू आनंदे आणि दप्तराविना शाळा हे उपक्रम माध्यमिक शाळांमध्ये राबविले जाणार आहेत. दप्तराविना शाळा हा उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणार आहे.
महापालिका भवनातील शिक्षण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रा. सोनाली गव्हाणे होत्या. या वेळी भाजपाच्या सदस्य सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे, तसेच प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, पराग मुंढे आदी उपस्थित होते. पहिलीच बैठक असल्याने ओळख परेड झाली. तसेच समितीचे अधिकार आणि सदस्यांचे कार्य या विषयी माहिती घेण्यात आली. तसेच शिक्षण समितीच्या बैठकीस स्थापत्य, विद्युत, आरोग्य अशा सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात यावे, या विषयी सदस्यांनी प्रशासनास सूचना केली.
शिक्षण समितीने या वेळी तीन उपक्रम राबविण्याची सूचना केली. प्रशासन अधिकारी शिंदे यांनी वाचू आनंदे आणि दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कारगिल, योग दिनाविषयी सदस्यांनी आग्रह धरला. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थना झाल्यानंतर योग प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. त्यामुळे योगविषयक जागृती वाढेल, असे सदस्यांनी सुचविले.
पहिलीच बैठक असल्याने ओळख करून घेतली. तसेच आगामी काळात राबविण्यात येणाºया उपक्रमांचे नियोजन, तसेच शिक्षण समितीची प्रतिमा उजळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दप्तराविना शाळा हा चांगला उपक्रम असणार आहे, असे सभापती सोनाली गव्हाणे यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षण विभागात १०५ शाळा असून, त्यात सुमारे अडतीस हजार मुले शिक्षण घेत आहेत. समितीने वाचू आनंदे आणि दप्तराविना शाळा हा उपक्रम आहे. मुलांमध्ये बुद्धिमता आणि स्मरणशक्ती वाढीला लागण्यासाठी कला आणि क्रीडा नेतृत्वगुुणांचा विकास होण्यासाठी हा उपक्रम असणार आहे, असे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Saturday school without Daptarva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.