मिळकत करासाठी शनिवारची मुदत

By admin | Published: December 25, 2016 04:47 AM2016-12-25T04:47:28+5:302016-12-25T04:47:28+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाची मिळकत कराची बिले वाटप करण्यात आली असून, मिळकत कर हा १ एप्रिल ते १ आॅक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या सहामाही हिश्श्याने

Saturdays to earn income | मिळकत करासाठी शनिवारची मुदत

मिळकत करासाठी शनिवारची मुदत

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाची मिळकत कराची बिले वाटप करण्यात आली असून, मिळकत कर हा १ एप्रिल ते १ आॅक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या सहामाही हिश्श्याने आगाऊ देय असतो. त्यानुसार थकबाकीसह पहिल्या सहामाही व दुसऱ्या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबर २०१६अखेर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे मिळकतधारकांकडे आता थकबाकीसह कराची रक्कम भरण्यासाठी शेवटचे आठ दिवस उरले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१६ अखेर मिळकतधारक यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कर बिलाची रक्कम भरणा केला न केल्यास थकीत थकबाकीसह पहिल्या व दुसऱ्या सहामाही अखेरच्या रकमेमधील करावर दरमहा २ टक्के, तर शासन करावर वार्षिक १० टक्के शास्ती व व्याजाची आकारणी १ जानेवारी २०१७पासून केली जाणार आहे.
महापालिकेच्या १६ कर आकारणी कार्यालयामध्ये साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, तरी मिळकतधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम भरून शास्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तर शुक्रवारअखेर ४ लाख ४४ हजार ७०९ मिळकतींच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार ९३१ मिळकतधारकांकडून ३११.५८ कोटी मिळकत कराचा भरणा केला आहे. हा भरणा मागील वर्षीच्या झालेल्या भरण्यापेक्षा ४७.२५ कोटीने जास्त आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Saturdays to earn income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.