पवना धरण परिसरात संततधार

By Admin | Published: June 28, 2017 04:15 AM2017-06-28T04:15:19+5:302017-06-28T04:15:19+5:30

पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाची सकाळपासून संततधार सुरू होती. मात्र, पवना धरण परिसरात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस पडला.

Saturn in the Pawana dam premises | पवना धरण परिसरात संततधार

पवना धरण परिसरात संततधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाची सकाळपासून संततधार सुरू होती. मात्र, पवना धरण परिसरात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस पडला. त्यामुळे पवनेचा साठ्यात १.३६ टक्के इतकी वाढ झाली आहे. एक जूनपासून धरण परिसरात ३६८ मिली पाऊस पडल्याने २३.७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे.
मावळात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरु वात झाली होती. पवन व नाणे मावळ परिसरात संततधार पावसामुळे भाताच्या लागवडीचा जोर वाढला आहे. कासारसाई धरण पसिरातही पावसाचा जोर आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाची भुरभुर सुरू होती. त्यामुळे शहरात गारवा पसरला. अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा मिळाला.
मुसळधार पावसाचा फटका प्रवशांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना कोंडीला सामोरे जावे लागले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे दिवसभर नागरिकांना फिरताना रेनकोट व छत्रीचा आधार घ्यावा लागला.

Web Title: Saturn in the Pawana dam premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.