नाव सुशोभीकरणाचे, उधळपट्टी कोट्यावधींची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:17 AM2018-06-14T03:17:45+5:302018-06-14T03:17:45+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाला घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Savitribai Phule, Pune University news | नाव सुशोभीकरणाचे, उधळपट्टी कोट्यावधींची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

नाव सुशोभीकरणाचे, उधळपट्टी कोट्यावधींची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Next

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाला घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसला मुळातच निसर्गसंपन्नतेची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वनराईने हा परिसर नटलेला आहे. मात्र, तरीही कृत्रिम सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधपट्टी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत व्यवस्थापन परिषद, सिनेट अस्तित्वातच नसल्याने यावर कोणाचाच वचक राहिलेला नव्हता. आता नव्याने आलेल्या व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्यांकडून याविरोधात आवाज उठविला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील सर्वांत मोठा वार्षिक अंदाजपत्रक मांडणारे श्रीमंत विद्यापीठ आहे. पुणे, नगर व नाशिक असे ३ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या खूपच मोठी आहे. त्याचबरोबर विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यापीठाकडे अर्ज येतात. या विद्यार्थ्यांचे नियमित शुल्क, प्रवेश अर्जांचे शुल्क याव्दार कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी विद्यापीठाकडे जमा होतो आहे. मात्र, हा पैसा कोणतेही नियोजन न करता सुशोभीकरण, जंगलाला मारलेली अनावश्यक कंपाऊंड व बांधकामे यावर खर्ची पाडला जात आहे.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पर्यावरण शास्त्र विभागापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बगीचा बनविण्यात आला. मात्र, हा बगीचा बनविल्यानंतर काही दिवसांत तिथल्या काही भागात खोदाई करण्यात आली.
विद्यापीठात अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांच्या परिसरात बगीचे उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. इतके खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानांमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
विद्यापीठातील खेळाचे मुख्य मैदान गेल्या ९ महिन्यांपासून चित्रपटाच्या सेटसाठी देण्यात आले आहे. विविध खेळांची मैदाने बनविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कामे सुरू आहेत. त्याचबरोबर नुकतीच व्यवस्थापन परिषदेकडून आणखी काही कामांच्या खर्चांसाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, प्रत्यक्षात या मैदानांचा विद्यापीठातील खेळाडू किती वापर करतात, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. खेळांच्या मैदानांवर झालेला
खर्च आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा झालेला वापर याचे आॅडिट करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात
येत आहे.

एका दिवसात ५०० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी निधी नाही म्हणून पीएच.डी. व एम.फिल विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले जात असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांवर भत्त्यांची मोठी खैरात केली जात आहे, याबाबतचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, त्याचे जोरदार पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले. कुलगुरूंच्या या दुजाभावाविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. डाप्सा संघटनेने याविरोधात स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरुवात केली, एका दिवसात ५०० विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून, या आंदोलनाला पाठिंबा दिला.

आज ठरणार आंदोलनाची दिशा
विद्यावेतन बंद करण्याच्या विरोधातील आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि.१४ जून रोजी दुपारी सव्वाचार वाजता अनिकेत कॅन्टिन येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

भत्त्यांच्या खैरातीचे आणखीन गैरप्रकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकाºयांवर करण्यात येणाºया भत्त्यांच्या खैरातीचे आणखीन काही गैरप्रकार उजेडात आले आहेत. परीक्षा विभाग, वित्त विभाग इथे बेकायदेशीरपणे भत्ते लाटले जात आहेत. त्याविरोधातही विद्यार्थ्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे.

कुलगुरूंचे मौन

पीएच.डी. व एम.फिलचे विद्यावेतन बंद करण्यात आल्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे; मात्र ते याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत.

जॉगिंग ट्रॅक वापराविना पडून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील
प्र-कुलगुरूंच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या खाणीच्या बाजूने गोलाकार जॉगिंग ट्रॅक विद्यापीठ प्रशासनाने
उभारला. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची पाडण्यात आला; मात्र हा ट्रॅक बंद ठेवण्यात आला असून, अनेक महिन्यांपासून तो वापराविना पडून आहे, याकडे कुलगुरू कधी लक्ष देणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Savitribai Phule, Pune University news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.