मद्य दुकानांची दिसली शटर उघडी, मग काय जमली ना भाऊ एकच गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 07:43 PM2021-04-20T19:43:23+5:302021-04-20T19:44:40+5:30

गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली अन् पिंपरीत काही दुकानं मालकांनी स्वतःहून तर काही पोलिसांना बंद करावी लागली.

Saw open shutters of liquor shops, then a crowd in pimpri | मद्य दुकानांची दिसली शटर उघडी, मग काय जमली ना भाऊ एकच गर्दी

छायाचित्र- अतुल मारवाडी

Next

पिंपरी : रेस्टॉरंट-बार आणि मद्य दुकानांमधून घरपोच मद्य विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मद्य दुकानांमधून घरपोच सेवा सुरू करण्यात आली.

मद्य दुकाने उघडी दिसताच काही ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली. काही दुकान मालकांनी स्वतःहून दुकाने बंद केली. तर काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. महसूल विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात सर्व उपहारगृहातून व बारमधून घरपोच मद्यसेवा देण्यास परवानगी दिली आहे. मद्य विक्री दुकानातून घरपोच मद्य पुरवठा करता येईल. कोणत्याही प्रकारे मद्य विक्री दुकाने उघडी ठेऊन मद्य विक्री करता येणार नाही. मद्य उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्यपुरावठा करण्यासाठी मद्याची वाहतूक करण्यासंदर्भात परवानगी देण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक कारवाई करावी, असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. 


पुणे जिल्हा वाईन मर्चंट असोसिएशनचे सचिव अजय देशमुख म्हणाले, राज्य सरकारने मद्य विक्री दुकानांना घरपोच मद्यसेवा देण्यास परवानगी दिली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसे तोंडी सांगितले आहे. कोरोना नियमांचे पालन करून काही जणांनी मद्य विक्रीस सुरुवात केली. काही जणांवर पोलिसांनी कारवाई केल्याने दुकान बंद करण्यात आले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सुविधा देता येईल. 
----
तर होऊ शकते कारवाई
सरकारने घरपोच मद्य सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मद्य घेण्यासाठी दुकानाबाहेर गर्दी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 
---/

घरपोच सेवेसाठी मद्य दुकानाचे शटर उघडताच नागरिकांनी दुकानाबाहेर गर्दी केली

Web Title: Saw open shutters of liquor shops, then a crowd in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.