‘आपल्याकडे का बघतो', असे म्हणत पिंपळे गुरवमध्ये तरुणावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 09:12 AM2023-08-21T09:12:56+5:302023-08-21T09:14:09+5:30

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे....

Saying 'Why are you looking at us', Pimple stabbed the young man in Gurav | ‘आपल्याकडे का बघतो', असे म्हणत पिंपळे गुरवमध्ये तरुणावर कोयत्याने वार

‘आपल्याकडे का बघतो', असे म्हणत पिंपळे गुरवमध्ये तरुणावर कोयत्याने वार

googlenewsNext

पिंपरी : ‘आपल्याकडे का बघतो,’ या किरकोळ कारणावरून एका तरुणावर पाच जणांनी मिळून कोयत्याने वार करत, सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १९) पिंपळे गुरव येथे घडली. या प्रकरणी मयूर चंद्रकांत शिंदे (वय २२, रा.देहू रोड) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी रिहान आरिफ शेख (१९, रा.पिंपळे गुरव) याला अटक केली असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टी स्टॉलवर थांबले होते. तेव्हा एका संशयित आरोपीसोबत ‘आपल्याकडे का बघतो,’ या कारणावरून वाद झाला. त्यावेळी इतर संशयित आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केला, तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: Saying 'Why are you looking at us', Pimple stabbed the young man in Gurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.