Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:35 PM2022-02-01T12:35:20+5:302022-02-01T12:36:14+5:30
पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती
पिंपरी : पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे असे त्यानी सांगितले होते. त्यामुळे कालपासूनच शाळांमध्ये तयारीला सुरुवातही झाली होती. आज पुणे जिल्ह्यात चिमुकल्यांनी शाळेत हजेरी लावल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवडमध्येही उत्साहात शाळा सुरु झाली आहे. शिक्षिका अत्यंत चांगल्या प्रकारे मुलांना समजून सांगतानाची पाहणी लोकमतने केली आहे. मुलांची तपासणी करून वर्गात सोडण्यात आल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले आहे.
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर आता पुण्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.
पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरू #Pune#schoolspic.twitter.com/NOxqpretJr
— Lokmat (@lokmat) February 1, 2022
एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील
राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज सुरु केले असले तरी अंतिम निर्णय पालकांनीच घ्यायचा आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे. म्हणजे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाऊन डबा खाऊ शकतील. नववीपासून पुढील वर्ग पूर्ण वेळ भरतील अशी माहिती देण्यात आली आहे. एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल असे अजित पवारांनी सांगितले होते.