पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा गुरुवारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 07:23 PM2018-08-08T19:23:31+5:302018-08-08T19:23:49+5:30
मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
पिंपरी : मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्हा व इतर संघटना यांच्या वतीने नऊ आॅगस्टला आंदोलन होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शासकीय आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी दिले आहेत.
मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवसासाठी बंद ठेवावेत, याबाबत संबधितांनी योग्य ती कार्यवाही करावी. व या दिवशी अपूर्ण राहणारा अभ्यासक्रम सुट्टीच्या दिवशी पूर्ण करण्यात यावा, असे डॉ. आष्टीकर यांनी सांगितले.