नेहरुनगर, वल्लभनगरातील शाळांची दुरवस्था

By admin | Published: July 8, 2017 02:19 AM2017-07-08T02:19:29+5:302017-07-08T02:19:29+5:30

प्रभारी मुख्यध्यापकांवर चालतो शाळेचा कारभार... शिक्षक कमी असल्यामुळे एकाच वर्गात भरतात दोन इयत्तांचे वर्ग... ओल्या

Schools in Nehrunagar, Vallabhanga, | नेहरुनगर, वल्लभनगरातील शाळांची दुरवस्था

नेहरुनगर, वल्लभनगरातील शाळांची दुरवस्था

Next

नेहरुनगर : प्रभारी मुख्यध्यापकांवर चालतो शाळेचा कारभार... शिक्षक कमी असल्यामुळे एकाच वर्गात भरतात दोन इयत्तांचे वर्ग... ओल्या चिंब वर्ग खोल्यात चिमुकल्या विद्यार्थांना लिहावे लागते ह्यअ, ब, क, डह्ण.... लहान मुलांना खेळायला खेळणी नाहीत... अस्वच्छतेमुळे विद्यार्थांना होतोय मच्छरांचा त्रास... शाळेचे मैदान बनले जंगल...
ही परिस्थिती आहे नेहरुनगर, वल्लभनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेची़ लोकमतच्या प्रतिनिधीने शाळेच्या आवारात केलेल्या पाहणीमध्ये या समस्या समोर आल्या आहेत. अशा कारणामुळेच अनेक महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थांचा टक्का कमी होऊन अनेक पालक आपल्या पाल्यांना चांगल्या शिक्षणासाठी सर्व सोयीयुक्त असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेत असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे कल वाढला आहे.
नेहरुनगर येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार इमारती असून या इमारतीमध्ये सकाळ व दुपार सत्रात एकूण ६ वर्ग भरतात़ तर बालवाडी चे ३ वर्ग खोल्या आहेत. बालवाडी च्या ३ वर्ग खोल्या असून या मधील दोन वर्ग खोल्या पाऊसामुळे गळत असल्यामुळे शिक्षणाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या बालवाडीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळक्या ओल्या चिंब होणाऱ्या वर्ग खोलीतच शिक्षणाचे बाराखडी शिकावी लागत आहे. याच बरोबर या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्यासाठी खेळणीदेखील नसल्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.
मुले क्रमांक २ व कन्या शाळा या शाळेमध्ये दुपारच्या सत्रात लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता या शाळेला गेल्या वर्ष भरापासून पूर्णवेळ मुख्यध्यापक नसल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून शाळेचा कारभार प्रभारी मुख्यध्यापक म्हणून दिलीप जाधव पाहत आहेत. ते सध्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असल्यामुळे एकाच वेळी त्यांना दुहेरी भूमिका बजवावी लागत आहे. याच बरोबर या शाळेमधील अनेक वर्ग खोल्यांची रंग रंगोटी खराब झालेली आहे, अनेक वर्ग खोल्यांमधील खिडक्यांची दुरवस्था झालेली आहे. शाळेमधील महाराष्ट्राच्या नकाशाची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून, या नकाशाची रंग रंगोटी गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाली
असून कोणता जिल्हा कोठे आहे, हे सुद्धा या नकाशामध्ये दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची ओळख होणार कशी? असा प्रश्न नकाशाला पाहिल्यावर पडतो. अनेक मुलांना बसण्याकरिता बेंच नसल्यामुळे त्यांना सतरंजीवर बसावे लागत आहे.
या मैदानातील भंगार साहित्य उचलून नेले आहे. मात्र या ठिकाणी फायबरच्या कचराकुंड्या उचलून नेल्या नसल्यामुळे या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढले असल्यामुळे मैदानाला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय
शाळेचे मैदान बनले जंगल?
वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ माध्यमिक शाळेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शाळा असून, अनेक मुले-मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेच्या मैदानात शहरातील इतर शाळांतील मोडकळीस आलेले बेंच, इतर भंगार वस्तू या मैदानात आणून टाकल्यामुळे या शाळेच्या मैदानाला भंगाराचे गोदामाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भंगारामुळे विद्यार्थ्यांना पीटीच्या तासाच्या वेळी फुटबॉल, क्रिकेट, खोखो, शर्यत, इतर मैदानी खेळताना मैदान अपुरे पडत आहे.


वर्गाच्या भिंती ओल्या;
एकाच वर्गात पहिली, तिसरीचा वर्ग
पंडित जवाहर लाल नेहरू मुले क्रमांक या शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत शाळा असून या शाळेत एकूण १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये अनेक वर्गाची रंग रंगोटी खराब झाली असून अनेक वर्गात पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपत असल्यामुळे वर्गाच्या भिंती ओल्या चिंब होत आहेत. तसेच या शाळेत ३ री व ४ थी च्या वर्गाला शिक्षक नसल्यामुळे शिक्षकांना नाईलाजस्तव एकाच वर्गात पहिली व तिसरीचा वर्ग व दुसऱ्या वर्गात दुसरी व चौथीचा वर्ग भरवावा लागत आहे. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा खलावत असून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल असा प्रश्न? उपस्थित केला जात आहे.

Web Title: Schools in Nehrunagar, Vallabhanga,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.