पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार : महापौर माई ढोरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 08:28 PM2020-12-12T20:28:23+5:302020-12-12T20:28:36+5:30

कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे.

Schools in Pimpri Chinchwad will remain closed till January 3: Information of Mayor Mai Dhore | पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार : महापौर माई ढोरे यांची माहिती

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार : महापौर माई ढोरे यांची माहिती

googlenewsNext

पिंपरी :  कोरोना विषाणूची भिती कायम असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा,  महाविद्यालये ३ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन केले होते.शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांनी शाळा उघडण्यात विरोध केला होता. त्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत रविवारपर्यंत आहे. मात्र, यापुढेही शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘शाळा सुरू करण्यांसदर्भात शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेशात नमूद केलेले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवूनच शाळा उघडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, शाळा, महाविद्यालयातील ९ ते १२ वीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड आजाराबाबत चाचणी पुर्ण झाली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निजंर्तुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारीपर्यंत  महानगरपालिका हद्दीतील शाळा बंदच रहाणार आहेत.  कोरोनाचा आढावा घेवुन महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’’
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘ सद्या पालकांची संमतीपत्र घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त ११३२ संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तुर्तास शाळा सुरु करणे योग्य रहाणार नाही.’’

Web Title: Schools in Pimpri Chinchwad will remain closed till January 3: Information of Mayor Mai Dhore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.