पिंपरी-चिंचवडमध्ये गोमांससह स्काॅर्पिओ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 08:42 IST2018-08-13T08:41:00+5:302018-08-13T08:42:21+5:30
दिघी मॅगझिन चौकातील प्रगती हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गाईचा कत्तल खाना सुरू होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये गोमांससह स्काॅर्पिओ ताब्यात
पिंपरी-चिंचवड : दिघी मॅगझिन चौकातील प्रगती हाॅटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गाईचा कत्तल खाना सुरू होता. रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने सर्वप्रथम ही माहिती पोलीस चौकीला फोनवरून कळवली. ज्या ठिकाणी गोमांस काढले जात होते. त्या परिसरातील दृश्य भयानक परिस्थिती दर्शवणारे होते.
सुमारे आठ ते दहा गाईची कत्तल करून गोमांस काढण्यात येत होते. उघडकीस आलेला प्रकार हा खूप दिवसांपासून सुरू असल्याचे परिसराच्या पाहणीत आढळून आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गोमांस विक्री करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र यावेळी घटनास्थळी एक स्काॅर्पिओ गाडी आढळून आली असून, या गाडीच्या पाठीमागे कत्तल केलेल्या गाईचे गोमांस मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. सोबत गाईंना बेशुद्ध करण्यात येण्याकरिता इंजेक्शन व औषधे आढळून आली आहेत.