चिंचवड येथे महाविद्यालयात भांडणातून विद्यार्थ्यावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:10 PM2018-03-12T17:10:32+5:302018-03-12T17:10:32+5:30
इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कागदाचे बोळे फेकल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले.
पिंपरी : कागदाचे बोळे फेकल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार चिंचवड य येथील फत्तेचंद जैन महाविद्यालयात आज सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडला. रुपेश राजेश गायकवाड (वय.१७ , रा. बळवंत कॉलनी, चिंचवड), असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपींवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रुपेश गायकवाड फत्तेचंद जैन महाविद्यायात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकतो.शनिवारी वर्गातील एका विद्या कागदाचे बोळे मारले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्याच दिवशी वाद मिटवण्यात आला. सोमवारी सात वाजता रुपेश कॉलेजसाठी आला. तास सुरु असताना एका विद्यार्थ्याने प्राचार्यांनी बोलावले आहे, असे कारण सांगून रुपेशला बाहेर बोलावले. महाविद्यालयाच्या आवारातच थांबलेल्या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यामध्ये रुपेश गंभीर जखमी झाला असून त्याला चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी या प्रकरणी घटनास्थळी भेट दिली आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.