पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:16 AM2022-11-08T08:16:22+5:302022-11-08T08:17:08+5:30

नोंद घेतल्याशिवाय सिमकार्ड विक्री करता येणार नाही..

Section 144 applicable in Pimpri Chinchwad Police Commissionerate jurisdiction | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

Next

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हत्यारांचे उत्पादन, विक्रीसाठी साठा व विक्रीस प्रतिबंध करण्यासह समाजविघातक व दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी भ्रमणध्वनी कार्ड विक्रेते, कामगार कंत्राटदार आणि लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांवर निर्बंध घालण्यासाठी २ जानेवारी २०२३ पर्यंत भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार नऊ इंच किंवा त्यापेक्षा जास्त लोखंडी पाते असलेले कोयता, पालघन व तत्सम लोखंडी हत्यार विक्रीसाठी बनवने, विक्रीसाठी साठा करणे किंवा विक्री करणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि, हा आदेश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लागू नाही.

नोंद घेतल्याशिवाय सिमकार्ड विक्री करता येणार नाही

सिमकार्ड विक्री करताना ग्राहकांची योग्य पडताळणी व खात्री केल्याशिवाय, सिमकार्ड कार्ड विक्री नोंदवहीमध्ये नोंद घेतल्याशिवाय सिमकार्ड विक्री करता येणार नाही. नोंदवही आपल्या दुकानांमध्ये ठेवून ग्राहकाबाबतची माहिती त्यामध्ये नमूद करावी. नोंदवही अभिलेख स्वरुपात किमान ५ वर्षांकरीता जतन करावी. 

कामगारांची नोंदवही तयार करावी

कामगार कंत्राटदारांनी आपल्याकडे कामगार कामावर ठेवताना त्याच्या पूर्व चारित्र्याची पडताळणी, त्यांचे कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय त्यांना अवैधपणे कामावर ठेवू नये, त्यांची निवासाची व्यवस्था करु नये. कंत्राटदारांनी कामावर ठेवलेल्या कामगारांची नोंदवही तयार करावी. त्याध्ये कामगारांची वैयक्तिक माहिती नमूद करावी. लॉज, हॉटेल, विश्रागृहाच्या मालकांनी ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र नोंदवहीमध्ये करावी. पोलीस व इतर तपासणी यंत्रणांना आवश्यक त्यावेळी सादर करावी.

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल,  असेही पोलीस आयुक्त श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Section 144 applicable in Pimpri Chinchwad Police Commissionerate jurisdiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.