निर्धारानंतरही गटबाजीचे दर्शन
By admin | Published: January 28, 2017 12:28 AM2017-01-28T00:28:07+5:302017-01-28T00:28:07+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुक्याच्या वतीने येथे आयोजित
वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुक्याच्या वतीने येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीला संपवण्याचा व पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला. परंतु या बैठकीला काही स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने गटबाजीचे दर्शन झाले.
गटबाजी संपवण्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नेते सरसावले असताना तालुकाध्यक्ष व इतर नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे गटबाजीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, राजाराम राक्षे, अर्चना घारे, माया भेगडे, संतोष भेगडे, गणपत शेडगे, सचिन घोटकुले, तानाजी दाभाडे, अंकुश आंबेकर, बाबूराव वायकर, नारायण ठाकर, विशाल वहिले, अतुल वायकर, वैभव नवघणे, किरण ओसवाल, विशाल दाभाडे, नीलेश दाभाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीत फक्त घड्याळ चिन्हाचा विचार करून निवडणुकीला सामोरे जायचे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बहुमताने निवडून आणून पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयाचा आहे,असे प्रास्ताविकात माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले.
माऊली दाभाडे म्हणाले, ‘‘पक्षातील नेते एकत्र नसल्यामुळे कार्यकर्ते व इच्छुक भेदरले असून, त्यांना आता एकत्र येऊन ताकत देण्याची गरज आहे. एकत्र नसल्यामुळे मावळात भाजपा संधी मिळत आहे. ’’
बापू भेगडे म्हणाले, ‘‘गटबाजीमुळे निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ती चूक सुधारण्याची आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची वेळ आली आहे. ’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी शेडगे यांनी केले. (वार्ताहर)