थकबाकीदारांच्या मिळकतीची जप्ती
By admin | Published: March 22, 2017 03:17 AM2017-03-22T03:17:13+5:302017-03-22T03:17:13+5:30
नोटीस बजावूनही मिळकतकराची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींवर बुधवारपासून (दि. २२) जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी : नोटीस बजावूनही मिळकतकराची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींवर बुधवारपासून (दि. २२) जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
करसंकलन विभागाकडून ज्या मिळकतधारकांकडे दहा हजारापेक्षा अधिक थकबाकी आहे, अशा २२ हजार ३४५ मिळकतधारकांना जप्तीपूर्वीच्या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. नोटीस बजावूनही अनेक मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. अशा थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
करसंकलन विभागाकडे चार लाख ४९ हजार ७६० मिळकतींची नोंद असून, त्यांपैकी तीन लाख २ हजार १९८ मिळकतधारकांनी ३६४ कोटी ६२ लाख इतका मिळकतकराचा भरणा केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. अधिकाधिक करभरणा होण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकतकराचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.