जनतेच्या सेवकांना निवडून द्या : कुरेशी
By Admin | Published: February 14, 2017 02:00 AM2017-02-14T02:00:10+5:302017-02-14T02:00:10+5:30
जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार
रहाटणी : जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल भालेराव, नगरसेविका अनिता तापकीर, सविता नखाते, नगरसेवक कैलास थोपटे या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी चांगल्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन कुरेशी यांनी केले.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता होती. त्यामुळे विकास करता आला. या शहराला सिंगापूर सिटीचे स्वरूप देण्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वप्न असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्वप्न साकारण्याचे योजिले आहे. त्यांच्या प्रयत्नांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. जातीयवादी पक्षांना महापालिकेत सत्ता मिळविण्यापासून रोखण्यासाठी समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीच्या पाठिशी असल्याचे कुरेशी यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोरगरिबांची कामे केली आहेत.
रहाटणीगाव-काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना कुरेशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रहाटणीगाव- काळेवाडी प्रभाग क्र. २८ मधून विशाल भालेराव, विद्यमान नगरसेविका अनिता तापकीर, सविता नखाते, विद्यमान नगरसेवक कैलास थोपटे हे निवडणूक लढवीत आहेत.
विद्यमान नगरसेविका अनिता तापकीर आणि विद्यमान नगरसेवक कैलास थोपटे यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात विविध विकासकामे केली असून, नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या संपूर्ण पॅनलला पुन्हा एकदा नगरसेवकपदाची संधी मिळणार असा विश्वास कुरेशी यांनी व्यक्त केला.
या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास तर झालाच आहे, विकासाला आणखी गती दिली जाईल. अभ्यासू उमेदवार पालिकेत निवडून जाणे गरजेचे असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केले. (वार्ताहर)