शीतपेयांची जादा दराने विक्री, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:24 AM2018-04-05T03:24:50+5:302018-04-05T03:24:50+5:30
ग्राहकांना कोणतीही वस्तू त्या वस्तूवरील छापील किमतीत मिळावी, यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा अंमलात आणला आहे. मात्र, याबाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन तेरा वाजले आहेत. शीतपेय व पाण्याच्या बाटल्याचा दर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दर आकारला जात आहे.
निगडी - ग्राहकांना कोणतीही वस्तू त्या वस्तूवरील छापील किमतीत मिळावी, यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा अंमलात आणला आहे. मात्र, याबाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन तेरा वाजले आहेत. शीतपेय व पाण्याच्या बाटल्याचा दर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दर आकारला जात आहे.
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे उद्योजक व व्यापा-याबरोबरच लागेबांधे आहेत. यामुळे मूल्य नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्राहकांना नाइलाजास्तव छापील किमतीपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. शीतपेय व पाण्याच्या बाटल्याचा दर छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दर आकारला जात आहे.
शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड ,आकुर्डी, देहूरोड, लोणावळा या भागातील रेल्वे स्टेशनवर शीतपेय विक्रेत्यांनी ग्राहकाची मोठ्या प्रमाणात लूट चालवली असून बाटली मागे सुमारे पाच रुपये जादा आकारणी करण्यात येत आहे. या प्रकाराकडे वैद्यमापन अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या वस्तूची छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणात शिक्षा व दंडाचीही तरतूद आहे. सध्या उन्हाळा असल्याने शीतपेय व थंड पाण्याच्या बाटलीला अधिक मागणी आहे. मात्र, छापील किमतीपेक्षा पाच रुपये जादा दराने बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने परिसरामध्ये चाकरमान्यांची प्रवासी संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी अनेक एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा आहे. चिंचवड परिसरामधून पुणे आणि लोणावळा येथे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे चिंचवड स्टेशन परिसरात मिनरल वॉटर, दही, मसाला ताक, बिस्कीट या वेगवेगळ््या खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने होत आहे.
प्रवाशांना तक्रार कोणाकडे करायची याची पुरेशी माहिती नसल्याने स्टेशन परिसरातील टपºयांचा धंदा तेजीत सुरू आहे. रेल्वे प्रशासन याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे़ शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाहणी असता असे निदर्शनास आले. की, मिनरल वॉटर, बिस्कीट, लस्सी, दूध, श्रीखंड, मसाला ताक, आम्रखंड या वस्तू जास्त दराने विकल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या या गलथान कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. प्रमाणित किमतीपेक्षा सर्रासपणे अधिक किमतीने खाद्यपदार्थ विकल्या जात असल्याने ग्राहकांची नुकसान होत आहे. दुकानदार प्रशासनाच्या कारवाईची भिती न बाळगता मनाप्रमाणे किमती ठरवत खाद्य पदार्थांची विक्री करतात. अशा मनमानीपणे विक्री करणाºयांवर संबंधित यंत्रणेने कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
स्टॉलकडे वळताहेत ग्राहकांची पावले
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शीतपेयांना प्रचंड मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी शीतपेयांचे स्टॉल पहायला मिळत आहेत. या स्टॉलवर विविध प्रकारचे शीतपेय विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान, दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा सहन होत नसल्याने शरीराला थंडावा देण्यासाठी ग्राहकांची पावले शीतपेयांच्या स्टॉलकडे वळतात. मात्र, येथील दर ऐकल्यानंतर ग्राहकांनाही धक्का बसतो. मात्र, सहन न होणारी उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी शीतपेयाचा आधार ग्राहकांना घ्यावा लागतो. याचाच गैरफायदा विक्रेते घेत असल्याचे दिसते.
उन्हाच्या तडाख्याचा शेतीवर परिणाम
मोशी : पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
मोशी, चºहोली, डुडुळगाव भागात आजही शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाºयांची संख्या लक्ष्यणीय आहे. परंतु सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्यामुळे शेतीमध्ये काम करण्यासाठी महिला टाळाटाळ करताना दिसत आहेत. उन्हात शेतीची कामे करणे देखील सहज शक्य नाही. शेतीची कामे करण्यासाठी रोजाने माणसे लावावी लागत आहेत़
मात्र वाढत्या उन्हामुळे रोजंदारीवर काम करण्यासाठीही माणसे मिळत नसल्यामुळे शेतीची कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे. अनेक भागात विहिरींना पाणी कमी पडत असून, पिकांना धोका निर्माण झाला आहे. अजून दोन महिने उन्हाळा बाकी असताना अंगाची लाहीलाही आत्तापासून होत असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे़