बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:59 AM2019-01-25T01:59:41+5:302019-01-25T01:59:45+5:30

मृत, तसेच बेपत्ता व्यक्तीची बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी संगनमताने मिळकत विक्रीचा प्रयत्न केला.

Selling of income through fake documents | बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री

googlenewsNext

पिंपरी : मृत, तसेच बेपत्ता व्यक्तीची बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी संगनमताने मिळकत विक्रीचा प्रयत्न केला. फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा राजेश सौदे यांनी फसवणूकप्रकरणी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. राजकुमार आतरसिंग सौदे (वय ४४, संत तुकारामनगर), निर्मावती आतरसिंग सौदे (वय ६०), ज्योती आतरसिंग सौदे (वय ३३, निगडी), विनोद लोहरीलाल लोघे (वय ३७), संगीता योगेश नागरमोते (वय ४९), योगेश हरिश्चंद्र नागरमोते (वय ४९ ) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, आरोपींनी फिर्यादी महिलेची बनावट सही केली. शिवकुमार आतरसिंग सौदे हे २००५ मध्ये बेपत्ता झाले आहेत, तर ६ फेब्रुवारी २०११ला राजेश आतरसिंग सौदे यांचे निधन झाले आहे. असे असताना बेपत्ता आणि मृत व्यक्तीच्या खोट्या सह्या करून आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार केला. ही मिळकत संगीता नागरमोते यांना विक्रीचा प्रयत्न केला. ही बाब निदर्शनास येताच फिर्यादीने फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Selling of income through fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.