दूध विक्री, खरेदीदरात घट

By admin | Published: April 11, 2015 05:11 AM2015-04-11T05:11:10+5:302015-04-11T05:11:10+5:30

गायीच्या दुधाच्या विक्रिदरात प्रतिलिटर २ , तर खरेदीदरात १ रुपया कमी करण्याचा निर्णय खासगी व सहकारी प्रमुख दूध संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

Selling of milk, decline in purchasing | दूध विक्री, खरेदीदरात घट

दूध विक्री, खरेदीदरात घट

Next

इंदापूर : गायीच्या दुधाच्या विक्रिदरात प्रतिलिटर २ , तर खरेदीदरात १ रुपया कमी करण्याचा निर्णय खासगी व सहकारी प्रमुख दूध संघाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी (दि. ९) पुणे येथे ही बैठक झाली. शनिवार (दि. ११) पासून या नव्या दाराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गतवर्षी शेतकऱ्यांचा दुधाचा खरेदी दर २५ रुपये प्रतिलिटर होता. तर स्किम्ड मिल्क पावडरचा दर २८० ते ३०० रुपये प्रतिकिलोच्या दराने होते. यामुळे या उपपदार्थांना चांगला भाव मिळत असल्याने या प्रकल्पांनी शासनापेक्षा अधिक दराने दूध खरेदी केले. मात्र यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्किम्ड मिल्क पावडरचे दर १३० रुपयांपर्यंत घसरले आहेत. यामुळे उत्पादन खर्च व विक्र ी यांचा ताळमेळ बसत नसल्याने हे प्रकल्पधारक उत्पादन बंद ठेवण्याचा विचार करत आहेत.
दूध व्यवसायामध्ये साधारणत: फेब्रुवारी ते मेदरम्यान उपपदार्थांचे दर व मागणी वाढते. मात्र या वर्षी एप्रिल महिना उजाडला तरी दर वाढण्याचा शक्यता कमी आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करण्यात आले. मात्र, यानंतर जे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा फायदा काही सहकारी दूध संघांनाच होत आहे. शासनाने यातून खासगी प्रकल्पांना वंचित ठेवले आहे, असे सोनाई दूधचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली.
महाराष्ट्रात साधारणत: एक कोटी तीस लाख लिटर दैनंदिन दूध उत्पादन होते. यातील सुमारे ८० टक्के दुधाचे पावडर, तूप, लोणी यांच्यामध्ये रूपांतर होते. (वार्ताहर)

Web Title: Selling of milk, decline in purchasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.