सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:32 AM2018-08-14T01:32:11+5:302018-08-14T01:32:30+5:30

पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत.

Selpipayi Jeevan Purna Parwanjeet | सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

googlenewsNext

पवनानगर : पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. परंतु त्या ठिकाणी महत्त्वाचे गेटवर धरणाचा एकही सुरक्षारक्षक नसल्याने चिंता धास्तावत आहे. परिसरात पर्यटक येत असतात. ते धरणाच्या परिसरात मध्यपान करत बसलेले असतात. सुरक्षारक्षक नसल्याने या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक व स्थानिक पाण्यात भिजण्याचा व फोटो काढण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहे. परंतु या ठिकाणी पाण्यात आत मध्ये जाऊन सेल्फी व फोटो काढण्याच्या नादात अनेकदा पर्यटक व स्थानिक नागरिक जखमी झाले होते. परंतु पवना धरणाचे अधिकारी फक्त पाहण्याची भूमिका घेत असल्याने जर काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धरण परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे.

पवना धरण हा परिसर नावारूपाला येत असून, धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत; परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने धरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
- नीलेश रवींद्र कालेकर,
माजी अध्यक्ष, राजमुद्रा ग्रुप, काले

दोन वर्षांपूर्वी जे पोलीस संरक्षण होते ते आताही घेण्यात यावे व हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात यावी.
- संदीप भुतडा,
माजी ग्रामपंचायत सदस्य, काले

आमच्याकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने दोन वर्षांपूर्वी चार पोलीस सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते; परंतु त्यांच्या पोलीस मुख्यालयाने काढून घेतल्याने मी खासगी सुरक्षारक्षकांसाठी मागणी केली आहे; परंतु अद्यापपर्यंत मला सुरक्षारक्षक उपलब्ध झालेले नाहीत. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.
- नानासाहेब मठकरी,
उपअभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला

Web Title: Selpipayi Jeevan Purna Parwanjeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.