सेनेवर कॉँग्रेस, राष्ट्रवादीची छाप

By admin | Published: July 8, 2015 02:10 AM2015-07-08T02:10:18+5:302015-07-08T02:10:18+5:30

शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट

Senate Congress, NCP's impression | सेनेवर कॉँग्रेस, राष्ट्रवादीची छाप

सेनेवर कॉँग्रेस, राष्ट्रवादीची छाप

Next

पिंपरी : शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलत इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेतून आलेल्यांना थेट शहरपातळीवर पदे दिल्याने शिवसेनेवर त्या पक्षांची छाप दिसत आहे. यामुळे सच्च्या शिवसैनिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. दुसरीकडे बाहेरून आलेली सेनेचे नेतेमंडळी वर्चस्व टिकविण्यासाठी आपला गट बळकट करण्यात रुची दाखवीत आहेत.
कॉँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राहुल कलाटे यांच्याकडे पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शहरप्रमुख म्हणून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला असतानाही त्यांच्याकडे पद गेल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. त्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस शहराची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षात निष्ठावंत आणि बाहेरचे असे सरळ दोन गट पडले. याचा मेळ घालण्यात त्यांना फारसे यश आले नाही. जुन्या शिवसैनिकांना लांबच ठेवत बाहेरच्या कार्यकर्त्यांना जवळ केले. त्यांना थेट शहरपातळीचे पदे बहाल केली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक श्याम लांडे, विनायक रणसुभे, कॉँग्रेसचे राजेश फलके, मनसेचे उल्हास कोकणे यांना थेट शहर उपप्रमुखपदी नियुक्त केले आहे. नाते-गोत्याचे हिससंबंध सांभाळत अनेकांची वर्णी लावली गेली आहे.
पक्ष स्थापनेपासून समन्वयक, संघटक गटप्रमुख ही पदे अस्तित्वात नव्हती. ती निर्माण करुन समांतर यंत्रणा उभी केली आहे. कामकाज सुरळीत न होता किचकट होण्याची शक्यता आहे. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवादात दरी निर्माण होणार हे उघड आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Senate Congress, NCP's impression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.