तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:02 IST2018-07-16T22:01:27+5:302018-07-16T22:02:03+5:30
पिकअप या वाहनाने धडक दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे.

तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला
ठळक मुद्दे एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल, वृध्दाचा शोध घेण्याचे कार्य सुरू
तळेगाव : तळेगाव स्टेशन येथील मौजे इंदोरी गावच्या हद्दीत पिकअप या वाहनाने (नं. एम एच ४2 ए क्यु १४३१ ) पाठीमागून ठोस दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे. ज्ञानेश्वर मोहन चव्हाण (वय ६२ रा. इंदोरी) असे पात्रात वाहुन गेलेल्या वृध्दाचे नाव आहे. एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली असुन वृध्दाचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. मावळात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने इंद्रायणीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तपास कार्यात अडथळा निर्माण होत आहे.