Vat Purnima: सात जन्म हीच पत्नी मिळावी; पूरूषांनी सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी!
By विश्वास मोरे | Published: June 21, 2024 06:33 PM2024-06-21T18:33:09+5:302024-06-21T18:34:57+5:30
महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी, पुरुषांचा महिलांना सल्ला
पिंपरी: पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. महिला वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा, म्हणून दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे म्हणून सात जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून सात फेरे मारले.
पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विकास कुचेकर म्हणाले की, महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आवाहन केले.'
अरण पवार म्हणाले कि, कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले ,याचे गांभीर्य ओळखुन वृक्ष लागवड केली पाहिजे, आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची सोय आहे. '
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले, की उच्च शिक्षित स्त्री व पुरुषामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा समानतेच्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल आणि नऊ वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा आयोजकाचे त्यांनी कौतुक केले.'
शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले, की पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला पण पूरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणी पासुन ते नासापर्यत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महीला पोचल्या आहेत,तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावे म्हणून १५० वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात मनोभावे पुजा करतात. मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये.म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून,सनई,वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले.
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या, आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन आमच्यासाठी दिर्घ आयुष्य मागीतले यामुळे खूपच आनंद झाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरुष वटपौर्णिमा साजरी केल्याने आम्ही सर्व महीला आनंदी झालोत.
शंकर नानेकर म्हणाले, आजही शासन म्हंणत कि स्त्री पुरुष समान आहेत व शासनाच्याच रोजगार हमी योजने मध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा कमी रोजगार दिला जातो आणि तसेच संसदेत सुद्धा ३३ टक्के आरक्षण मिळत नाही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढया संसदेत महिला खासदार आहेत म्हणजेच शासनाचे फक्त बोलायचे एक आणि करायचे असं सरकारच काम चालू आहे असं मला वाटतं.' वृक्ष मित्र अरुण पवार यांनी पर्यावरण संरक्षण आणि सर्वधनाची ,व प्लास्टिक न वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली.