रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 05:23 PM2020-05-05T17:23:09+5:302020-05-05T17:25:06+5:30

तरूण लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना

Seven corona positive was found in Rupeenagar, Sambhajinagar, in Talwade, one in Pune | रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर

रूपीनगर, संभाजीनगर, तळवडेतील सात, पुण्यातील एक पॉझिटिव्ह; पिंपरीत रूग्णांची संख्या ६३ वर

Next
ठळक मुद्देमायलेकींना झाली कोरानाची बाधा

पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दिवसभरात आठ नवीन रूग्ण सापडले असून त्यात तरूण आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६३ वर गेली आहे. आजपर्यंत १३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मायलेकींनाही कोरानाची बाधा झाली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी रूग्ण वाढीची चेन तोडण्यात यश आले आहे. पुण्यापेक्षा पिंपरीत कोरोनाचा वेग काहीसा कमी आहे. शहरातील २१ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून शहराचा नव्वद टक्के भाग कंटेन्मेट मुक्त झाला असून केवळ दहा टक्के क्षेत्रात कंटन्मेंट झोन आहे.
पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी १८१  रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९७ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील १८१   जणांच्या घशातील द्रवाचे नमुने  पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल मंगळवारी सकाळी आले असून त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सहा पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
 पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ६३ असून त्यातील ११ रूग्ण पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून पुण्याबाहेरील दोन रूग्ण पिंपरीतील वायसीएम रूग्णालय आणि भोसरीतील महापालिका रूग्णालयात उपचार घेत आहे.  तसेच  ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेले आठ  जण हे  पुण्यातील शिवाजीनगर, तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, जुनीसांगवी येथील परिसरातील आहेत. त्यात सहा  पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पुरूषांमध्ये एकाचे वय ११ वर्षे  दुसºयाचे वय २२, तिसºयाचे वय ३९, चौथ्याचे वय ६१, पाचव्याचे वय ७४ वर्ष तर एका चार वर्षांचा मुलांचाही समावेश आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय दीडमहिना, दुसरीचे वय ३७ वर्षे आहे. तसेच कासारवाडीमधील दोन जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे.

Web Title: Seven corona positive was found in Rupeenagar, Sambhajinagar, in Talwade, one in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.