मोटार अपघातामध्ये सात जण जखमी; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:19 AM2017-11-04T04:19:42+5:302017-11-04T04:19:48+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर समोर जाणाºया कंटेनरला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील सात प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खंडाळा येथील किमी ५१ जवळ घडली.
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर समोर जाणाºया कंटेनरला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील सात प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खंडाळा येथील किमी ५१ जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणाºया मोटारीची (क्रमांक एम एच १५ डीएम ९९४०) समोर जाणाºया अज्ञात कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला. मोटारीमध्ये सात प्रवासी होते. त्यापैकी किरकोळ जखमींवर लोणावळा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. सर्व जखमी नाशिक येथील घोटी गावचे रहिवासी आहेत.
अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपचे सदस्य व आयआरबीचे कर्मचारी यांनी तातडीने अपघातस्थळी पोहोचत उपचाराकरिता त्यांना रुग्णालयात रवाना केले. तसेच जखमींच्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांना अपघाताची कल्पना दिली. अपघातात गाडीचा अक्षरश:
चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये मोटारीचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले. महामार्गावर रात्रीच्या वेळी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.