उर्से गावठाणात सांडपाणी रस्त्यावर

By admin | Published: June 10, 2015 05:04 AM2015-06-10T05:04:45+5:302015-06-10T05:04:45+5:30

उर्से गावठाणामधील रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून सांडपाणी साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

On the sewerage road in Ursa village | उर्से गावठाणात सांडपाणी रस्त्यावर

उर्से गावठाणात सांडपाणी रस्त्यावर

Next

उर्से : उर्से गावठाणामधील रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून सांडपाणी साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही सरपंच, उपसरपंच, सदस्य लक्ष देत नाहीत, यामुळे येथील नागरिकांनी संतापाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
गेल्या सहा महिन्यांपासूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकाविषयी चर्चा व तयारी गावातील इच्छुकांनी केली आहे. या ठिकाणाहून सांडपाण्यासाठी चेंबर टाकण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हे चेंबर तुंबल्याने येथील नागरिकांच्या घरात व गाय-म्हशींच्या गोठ्यात हे सांडपाणी जात आहे. या ठिकाणी येथील लहान मुलेही साचलेल्या पाण्यात खेळत असल्याने मोठ्यांसह लहान मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून तो धोकादायकही ठरू शकतो.(वार्ताहर)

Web Title: On the sewerage road in Ursa village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.