हिंजवडी आयटीपार्क येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी 'ते 'हॉटेल केले सील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 11:35 AM2020-12-18T11:35:04+5:302020-12-18T11:37:40+5:30

हिंजवडी येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.

Sex racket exposed at Hinjewadi IT Park; The police sealed the hotel | हिंजवडी आयटीपार्क येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी 'ते 'हॉटेल केले सील

हिंजवडी आयटीपार्क येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी 'ते 'हॉटेल केले सील

googlenewsNext

पिंपरी : आयटीपार्क, हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात ही कारवाई केली होती. या हॉटेलला सहा महिन्यांसाठी पोलिसांनी ‘सील’ केले आहे.  
गणेश कैलास पवार (वय २०, रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी, मूळ रा. सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

हिंजवडी येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून तरुणींची सुटका केली. त्यानंतर हे हॉटेल सीलबंद करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. आयुक्तांनी कायदेशीर बाबींचे अवलोकन करून हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्यांच्या आदेशानुसार हॉटेल सहा महिन्यांसाठी सीलबंद करण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक अनंत दळवी, पोलीस कर्मचारी किरण पवार, विजय घाडगे, अविनाश कुमटकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Sex racket exposed at Hinjewadi IT Park; The police sealed the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.